विरंगुळा
मराठी गोष्टी
मराठी गोष्टी
शिरपूर गाव, कोकणात वसलेलं, तसं लहानसं खेडं, पाचशे-सहाशे वस्तीचं, गणपत व भीमाबाई पाटील हे जोडपे आजारपणात मरण पावले. त्यांचा एकुलता एक मुलगा शिरीष, तेव्हा चार वर्षांचा होता.
तनयाला Bio-technology साठी पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाले, तिचे शालेय आणि ज्युनिअर कॉलेज शिक्षण कोल्हापूरला झाले होते, मे महिना तनयाच्या शॉपिंग मध्ये गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, तनया पुण्याला जायला निघणार होती. Continue Reading
चला , चला तयार व्हा , आता तुम्हांला मृत्युलोकात जायचे आहे , देवदूत आम्हां सर्वांना सूचना देत होता , फुलांनी सजवलेले विमान तयार होते . देवाने आम्हां सर्वांकडे एकवार प्रेमाने पहिले आणि ' निघा ' अशी खूण केली . Continue Reading
आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यास, श्रीमंत होण्याचा, मग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ?
अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नका, मी काय म्हणते याचा विचार करा . Continue Reading
‘शुभ मुहूर्त’ या वधू -वर सूचक मंडळाने मुलामुलींना भेटता यावे, बोलता यावे यासाठी एका हॉलमध्ये 'पहाण्याचा' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी शारदाकाकू, त्यांचे यजमान आणि त्यांचा मुलगा राघव गेले होते . Continue Reading
ए तनु , आता माझा नंबर ना ! तू कशी काय खेळतेस ? मी तनुच्या हातातील चिपी खेचत म्हणाले.
"शरू, तुला चान्स दिला होता, तेव्हा तू पडली आणि आऊट झाली," तनु मला चिडून म्हणाली. Continue Reading.
आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला, मी ठरवले, की हातातील काम पूर्ण करूनच निघावे, weekend आहे, उगाच सोमवारपर्यंत काम पेंडिंग ठेवायला नको. Continue Reading.
लग्न सोहळा; आयुष्यातील महत्वाचा, आनंदाचा क्षण; त्यात तो माझा खास मित्र. त्यामुळे त्याच्या लग्नाला, मी हजर राहणारच, मग ऑफिसमध्ये कितीही काम असो. Continue Reading.
आमची 'गरवारे चाळ ' अगदी बटाट्याच्या चाळीसारखी प्रसिद्ध नाही, पण लोकप्रिय आहे . ही चाळ एक मजली आहे, ग्राउंड आणि पहिला मजला , जिन्याच्या उजव्या बाजूला आठ घरं आणि डाव्या बाजूला आठ घरं म्हणजे ग्राउंडला १६ आणि पहिल्या मजल्यावर १६ अशी एकूण ३२ बिऱ्हाडं या गरवारे चाळीत राहतात . Continue Reading
आज १ एप्रिल, महिन्याचा पहिला दिवस , 'एप्रिल फूल बनाया , तो उनको गुस्सा आया' नवरा आरशासमोर केस विंचरताना मजेत गाणं गुणगुणत होता आणि मी किचनमध्ये ओट्याजवळ, उकाड्याने हैराण होत, नाष्ट्यासाठी थालीपीठ बनवत होते, मनात राग उसळत होता, मला fool बनवण्यासाठी तुम्हांला १ एप्रिलची काय गरज आहे ! Continue Reading
येत्या शनिवारी, सौभाग्यवतीला घेऊन पिच्चरला जाऊया, मस्तपैकी बाहेर जेऊया आणि जमलंच तर एखादे गिफ्ट तिला देऊया असा मी मनात बेत आखत होतो. तेवढ्यात 'साहेबांनी बोलावलंय'असा सखाराम शिपायाचा कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला. Continue Reading.
आई आई ..... अग मी उडत आहे, मला पकड ना ! अग मी दिवाणखान्यातून उडत उडत गच्चीवर आले . अय्या गच्चीतल्या झाडांवर किती छान फुलपाखरे बसली आहेत , त्यांचे रंग किती सुंदर आहेत; पिवळा , निळा ,गुलाबी व त्यावर काळे ठिपके अगदी माझ्या फ्रॉकसारखे . Continue Reading
आईss सुमी ना अगदी वाईट मुलगी आहे, मी तिच्याशी मुळीच बोलणार नाही. सई शाळेची बॅग ठेवताना बोलत होती, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. "काय झाले? सुमीशी भांडलीस का? ती तर तुझी best friend आहे ना" ,मी म्हणाले. Contine Reading
आज परिक्षेचा रिझल्ट लागला , मी सहावीतून सातवीत गेलो . " मला स्कूलमध्ये NCC हा विषय येणार , खाकी रंगाचा युनिफॉर्म , शूज , कॅप वा! मस्त आणि त्या युनिफॉर्ममध्ये मी शूरवीरासारखा दिसणार" मी म्हणालो. Continue Reading
अहोss हे काय! १०० रुपयांची नोट फाटकी आहे, अशी कशी घेतलीत? बघितले नाही का? आईच्या प्रश्नांचा बाबांवर भडिमार चालू झाला. बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते. Continue Reading
आज, मला नवीन ठिकाणी आणले आहे, येथे फुलांची सुंदर सजावट केली आहे, दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत, खूप छान वाटत आहे. देवा, भिंतीवर पण काहीतरी लिहिलेले दिसतंय, पण झाकलेले आहे, का बरं ? मला कळत नाही. Continue Reading
आज, दहावीचा शेवटचा पेपर देऊन मी वर्गाबाहेर पडले, बरेच दिवस अभ्यासाचं ओझं डोक्यावर होतं, ते आज खाली झालं. हुश्श ! परीक्षा झाली, एकदाची परीक्षेची कटकट संपली, आता फक्त धमाल असे वेगवेगळे उद्गार माझ्या कानावर पडत होते. Continue Reading
आई ss..आणखी किती वेळ अभ्यास करू, मला कंटाळा आलाय, माझे मित्र खेळायला माझी वाट बघत असतील, जाऊ का मी? मी आपला बोलतोय, बोलतोय आणि आई चक्क चंडिका देवीच्या अवतारात माझ्यासमोर उभी, फक्त हातात शस्त्रांऐवजी काठी व पट्टी होती, Continue Reading
माझी श्रिया, घरात बागडणारे फुलपाखरू, आता स्कूलला जाणार होती. नुकतंच तिचे ऍडमिशन 'kindergarten' मध्ये झाले. नवीन युनिफॉर्म, नवीन स्कूल बॅग, नवीन डबा, नवीन वॉटर बॉटल, सारं काही नवीन त्यामुळे तिच्या उत्साहाला उधाण आले होते. पण माझा जीव मात्र घाबरला होता Continue Reading